HomeUncategorizedफाळेगावच्या जाधव दांपत्याचा पुरात वाहून मृत्यू.

फाळेगावच्या जाधव दांपत्याचा पुरात वाहून मृत्यू.

फाळेगावच्या जाधव दांपत्याचा पुरात वाहून मृत्यू.

॥ दिव्य दृष्टी वृत्तसेवा ॥

 बाभूळगाव तालुक्यातील फाळेगाव येथील रहिवाशी रवींद्र जाधव व त्यांची पत्नी अंकिता जाधव हे दोघे पती-पत्नी पुलगाव(वर्धा) नजीकच्या विटाळा येथील वर्धा नदीच्या पुलावरून दुचाकीसह पुराच्या पाण्यात पडले यातच त्यांचे निधन झाले. उत्तम सामजिक सलोखा असलेल्या जाधव दाम्पत्याच्या अचानक मृत्यूच्या घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली आहे.           प्राप्त माहितीनुसार फाळेगाव येथील रहिवाशि अंकिता रवींद्र जाधव वय ३५ वर्ष व रवींद्र नंदकिशोर जाधव वय ४० वर्ष हे दोघे पती-पत्नी आपली दुचाकी घेऊन दिनांक दोन सप्टेंबर रोजी रवींद्रच्या आत्याकडे वर्धा जिल्ह्यातील पूलगाव येथे गेले होते. आत्या बाहेर गावी गेल्याने ते पत्नीच्या नातेवाईका कडे मोठी आंजी गावाला गेले. तेथे मुक्काम करून दुसऱ्या दिवशी सकाळी परतीच्या प्रवासाला निघाले असता आधल्या रात्री विटाळा नदीच्या पुलावरून पुराचे पाणी  गेल्याने  पूलावर गाळ साचलेला होता.त्यांची दुचाकी घसरली व दोघेही पुलावरून दुचाकीसह नदीला आलेल्या पुराच्या पाण्यात पडले आणि वाहून गेले.दोन दिवस सातत्याने नदीला पुर असल्याने दोघांपैकी रवींद्र जाधव चे प्रेत दोन दिवसा नंतर  हाती लागले.  तर अंकिताचे प्रेत तिसऱ्या दिवशी मिळून आले. यामुळे एक दिवसाआड दोघांवर फाळेगाव येथे अंत्यसंस्कार पार पडले.  त्यांच्या मागे आई,-वडील व दोन विवाहित बहिणी असा परिवार आहे. फळेगावच्या तलाठी वैशाली लढी, कोतवाल भाऊ हिवरे यांनी आपला अहवाल बाभुळगाव तहसील कार्यालयाला सादर केला आहे. या घटनेने गाव, परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

          

  

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Must Read

spot_img