Divya Drushti. Babhulgaon.3 sep
पूर्व विदर्भातील अनेक जिल्ह्यांमध्ये अतिशय वेगळ्या पद्धतीने पोळा हा सण साजरा केला जातो. राज्याच्या इतर भागात ज्या प्रकारे बैल पोळा साजरा केला जातो, अगदी त्याचप्रकारे पोळ्याच्या पाडव्याला विदर्भात तान्हा पोळा साजरा करण्याची परंपरा आहे. बैलाचे महत्व लहान मुलांच्या देखील लक्षात यावे या अनुशंगाने बाभुळगाव तालुक्यातील आसेगाव(देवी) येथे आज ३ सप्टेंबर रोजी. स्वर्गीय वासुदेवराव गावंडे यांच्या स्मृती प्रित्यर्थ सार्वजनिक गणेश उत्सव मंडळाच्या वतीने वेगवेगळ्या स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते.
स्पर्धेदरम्यान चिमुकल्यांनी सहभाग नोंदवून आपल्या कलेचे दर्शन घडवले. मातीच्या बैलाची सजावट करुन सादरीकरण करण्यात आले. सकाळी सात वाजल्यापासून लहान मुले ही स्पर्धेच्या ठिकाणी विविध प्रकराच्या वेषभूषेत सहभागी झाली होते. मात्र, आकर्षक बैलांचे निरीक्षण करून पाच स्पर्धकांची निवड करण्यात आली ज्यामध्ये पहिले बक्षीस आयुष गावंडे, दुसरे बक्षीस वंश पुसदकर, तिसरे बक्षीस मनश्री तडसकर, चौथे बक्षीस अर्नव आरेकर, पाचवे बक्षीस देवांशु कुहिटे आणि सहावे बक्षीस नमन आत्राम या चिमुकल्यांना देण्यात आली. तसेच स्पर्धेमध्ये आकर्षक वेशभूषा केलेल्या सहा चिमुकल्यांची निवड करण्यात आली. ज्यामध्ये पहिला क्रमांक नव्या दुर्गे, दुसरा मनु कुहिटे, तिसरा कृष्णाई मानकर, चौथा प्राप्ती भबुतकार, पाचवा परी उडाखे आणि सहावा क्रमांक अथर्व कुहिटे यांनी पटकाविला यावेळी विजेत्यांना प्रमुख पाहुन्यांच्या हस्ते पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. यावेळी गावातील प्रमुख देवरावजी वेळुकर(गुरुजी), सरपंच सचिन चव्हाण, पुंडलिक भगत, गजानन कोळनकर, ज्ञानवर्धन भगत, सुनील टप्पे, अविनाश गावंडे, विवेक तडसकर, संदीप लुनावत, गिरीश टप्पे, दीपक वेळुकर उपस्थित होते. या तान्ह्या पोळ्याचे सूत्र संचालन व आभार प्रदर्शन रमेश राऊत यांनी केले. बळीराजाचा खरा सोबती असलेल्या बैलाबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस पोळा असतो त्याच पध्दतीने लहान मुलांमध्ये सुद्धा हे संस्कार बिंबावे यासाठी सार्वजनिक गणेश उत्सव मंडळाच्या वतीने गावकऱ्यांचा उपस्थितीत चिमुकल्याच्या तान्हा पोळ्याचे आयोजन करण्यात आले होते.Divya Drushti. Babhulgaon.3 sepपूर्व विदर्भातील अनेक जिल्ह्यांमध्ये अतिशय वेगळ्या पद्धतीने पोळा हा सण साजरा केला जातो. राज्याच्या इतर भागात ज्या प्रकारे बैल पोळा साजरा केला जातो, अगदी त्याचप्रकारे पोळ्याच्या पाडव्याला विदर्भात तान्हा पोळा साजरा करण्याची परंपरा आहे. बैलाचे महत्व लहान मुलांच्या देखील लक्षात यावे या अनुशंगाने बाभुळगाव तालुक्यातील आसेगाव(देवी) येथे आज ३ सप्टेंबर रोजी. स्वर्गीय वासुदेवराव गावंडे यांच्या स्मृती प्रित्यर्थ सार्वजनिक गणेश उत्सव मंडळाच्या वतीने वेगवेगळ्या स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. स्पर्धेदरम्यान चिमुकल्यांनी सहभाग नोंदवून आपल्या कलेचे दर्शन घडवले. मातीच्या बैलाची सजावट करुन सादरीकरण करण्यात आले. सकाळी सात वाजल्यापासून लहान मुले ही स्पर्धेच्या ठिकाणी विविध प्रकराच्या वेषभूषेत सहभागी झाली होते. मात्र, आकर्षक बैलांचे निरीक्षण करून पाच स्पर्धकांची निवड करण्यात आली ज्यामध्ये पहिले बक्षीस आयुष गावंडे, दुसरे बक्षीस वंश पुसदकर, तिसरे बक्षीस मनश्री तडसकर, चौथे बक्षीस अर्नव आरेकर, पाचवे बक्षीस देवांशु कुहिटे आणि सहावे बक्षीस नमन आत्राम या चिमुकल्यांना देण्यात आली. तसेच स्पर्धेमध्ये आकर्षक वेशभूषा केलेल्या सहा चिमुकल्यांची निवड करण्यात आली. ज्यामध्ये पहिला क्रमांक नव्या दुर्गे, दुसरा मनु कुहिटे, तिसरा कृष्णाई मानकर, चौथा प्राप्ती भबुतकार, पाचवा परी उडाखे आणि सहावा क्रमांक अथर्व कुहिटे यांनी पटकाविला यावेळी विजेत्यांना प्रमुख पाहुन्यांच्या हस्ते पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. यावेळी गावातील प्रमुख देवरावजी वेळुकर(गुरुजी), सरपंच सचिन चव्हाण, पुंडलिक भगत, गजानन कोळनकर, ज्ञानवर्धन भगत, सुनील टप्पे, अविनाश गावंडे, विवेक तडसकर, संदीप लुनावत, गिरीश टप्पे, दीपक वेळुकर उपस्थित होते. या तान्ह्या पोळ्याचे सूत्र संचालन व आभार प्रदर्शन रमेश राऊत यांनी केले. बळीराजाचा खरा सोबती असलेल्या बैलाबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस पोळा असतो त्याच पध्दतीने लहान मुलांमध्ये सुद्धा हे संस्कार बिंबावे यासाठी सार्वजनिक गणेश उत्सव मंडळाच्या वतीने गावकऱ्यांचा उपस्थितीत चिमुकल्याच्या तान्हा पोळ्याचे आयोजन करण्यात आले होते.