बाभुळगाव पोलिसांचा दणदणीत रूट मार्च
॥ दिव्य दृष्टी वृत्तसेवा ॥
आगामी काळात होवू घातलेले सण तथा सार्वजनिक उत्सव शांततेत पार पडावे व कायदा आणि सुव्यवस्था राखली जावी या उद्देशाने आज दि. १० सप्टेंबर रोजी बाभुळगाव पोलीस स्टेशनच्या हद्दीत दुपारी १२ वाजताच्या दरम्यान स्थानिक बाभुळगाव शहरामध्ये ईद ए मिलाद मिरवणूक व गणेश उत्सव मिरवणूकीच्या मार्गाची पडताळणी करण्यात आली.याकरिता बाभुळगाव पोलिस निरीक्षक लहुजी तावरे यांचे मार्गदर्शनात रूट मार्च (पथ संचलन )घेण्यात आला.सदर रूट मार्च मध्ये बाभुळगाव पोलिस स्टेशनचे वरिष्ठ अधिकारी, अंमलदार, प्लाटून, होमगार्ड तसेच जिल्हा स्तरावरून बोलवण्यात आलेले दंगल नियंत्रक दलाचे जवानही सहभागी झाले होते.शेकडो कर्मचाऱ्याच्या उपस्थितीत निघालेल्या रुट मार्च मधून आगामी परिस्थितीस सामोरे जाण्याची पोलिसांची पूर्वतयारी दिसून आली. यामुळे असामाजिक मनोरुत्ती बाळगनाऱ्यां मध्ये चांगलच वाचक निर्माण झाला.