पेसा क्षेत्रातील पदभरतीसाठी बेरोजगार आदिवासी उमेदवारांचे बेमुदत साखळी उपोषण
मुख्यमंत्र्यांनी दिलेला शब्द पाळावा…. उपोषणकर्त्यांची मागणी
दिव्यदृष्टी डिजिटल वृत्तसेवा | यवतमाळ | समीर शिंदे : (berojgaranche uposhan )
राज्यातील पेसा क्षेत्रामधील १३ जिल्ह्यात १७ संवर्गामधील अंतिम शिफारस प्राप्त आदिवासी उमेदवारांना अद्यापर्यंत नियुक्ती आदेश मिळालेले नाही. त्यामुळे दि.२५ सप्टेंबर पासून बेरोजगार आदिवासी उमेदवारांनी जिल्हा परिषदेसमोर बेमुदत (berojgaranche uposhan ) साखळी उपोषणाला सुरुवात केली आहे. पेसा भरतीचा प्रश्न सोडवण्यासाठी शासन सकारात्मक आहे. पेसा क्षेत्रातील बेरोजगार आदिवासी उमेदवारांना १५ सप्टेंबर पर्यंत नियुक्ती आदेश देण्यात येईल. अशी ग्वाही खुद्द राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी २९ आँगस्ट रोजी सह्याद्री अतिथी ग्रुहावर पार पडलेल्या बैठकीत आदिवासी शिष्टमंडळाला दिली होती.
मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या शब्दावर विश्वास ठेऊन,अंतिम शिफारस प्राप्त आदिवासी उमेदवारांना १५ सप्टेंबर पर्यंत नियुक्ती आदेश मिळेल या आशेने आदिवासी समाजाच्या शिष्टमंडळाने सरकारला सकारात्मक प्रतिसाद देत १ आँगस्टपासून नाशिक व इतरही आदिवासी बहूल जिल्ह्यात सुरु असलेले (berojgaranche uposhan ) उपोषण मागे घेतले होते. परंतू अद्यापही अंतिम शिफारस झालेल्या उमेदवारांना नियुक्ती आदेश मिळालेले नाहीत.त्यामुळे अनुसूचित क्षेत्रातील बेरोजगार आदिवासी उमेदवारांनी पुन्हा बेमुदत (berojgaranche uposhan ) साखळी उपोषण सुरु केले आहे. शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाने १३ आँक्टोबर २०२३ रोजी आणि महसूल व वन विभागाने १७ आँक्टोबर रोजी पत्र काढून अनुसूचित क्षेत्रातील संपूर्ण भरती प्रक्रिया थांबवली आहे. त्यामुळे आदिवासी समाजाची लोकसंख्येच्या प्रमाणात १०० टक्के, ५० टक्के आणि २५ टक्के आरक्षित असलेली पदे अद्यापही रिक्त आहे. मागण्या पूर्ण करण्यासाठी नयन पेंदोर,गौरव गेडाम,आकाश मेश्राम,वैभव कुडमेथे,सुर्यकांत पेंदोर,देवराव मेश्राम,सचिन धुर्वे,संजय कुडमेथे,अशोक आत्राम,अविनाश टेकाम,पंकज पेंदोर,अतुल कुळसंगे,रोशन चांदेकर,शुभम गेडाम,अक्षय तोडसाम,स्वप्निल टेकाम,पुजा मडावी,सोनाली सोयाम,शिला अरके,माधुरी तलांडे,शुभांगी पेंदोर,काजल किनाके,स्नेहा आडे,मनिषा गेडाम,पुजा कुडमेथे,सिमा कोरांगे,प्रांजली आत्राम,कल्याणी चांदेकर,कल्पना नैताम,सजिता किनाके, कल्याणी आत्राम,पल्लवी शेडमाके आदी बेरोजगार आदिवासी उमेदवार (berojgaranche uposhan ) उपोषणाला बसले आहेत.