सुरक्षा दलाच्या गोळीबारात 5 नक्षलवादी ठार
दिव्यदृष्टी डिजीटल वृत्तसेवा। बाभूळगाव:-
गडचिरोली आणि छत्तीसगड राज्याच्या कांकेर जिल्ह्याला लागून असलेल्या भामरागड तहसीलमध्ये सुरक्षा दल आणि नक्षलवादी गटांमध्ये चकमक झाल्याची माहिती समोर आली आहे. गडचिरोलीचे एसपी कोपर्शी नीलोत्पल यांनी या घटनेची पुष्टी केली आणि सांगितले की, जंगल परिसरात नक्षलविरोधी अभियानात सुरक्षा दलांवर गोळीबार केल्यानंतर 5 नक्षलवादी ठार झाले. या वनपरिक्षेत्रात शोधमोहीम सुरू असून मृत नक्षलवाद्यांची ओळख पटवण्याची प्रक्रिया सुरू आहे.
महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर घडलेल्या या घटनेने राज्याचे लक्ष वेधून घेतले आहे. कारण राज्य पुढील महिन्यात होणा-या निवडणुकीची तयारी करत आहे. त्यानुसार गडचिरोलीत पोलिसांचे C60 कमांडो आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक सुरू आहे. छत्तीसगड-महाराष्ट्र सीमेवर आहे. चकमकीत सुरक्षा दलाचे सदस्य जखमी झाल्याची माहिती आहे. जिल्ह्याच्या भामरागड तहसीलच्या कोपरी जंगलात चकमक सुरू असून, दोन्ही बाजूंनी प्रत्युत्तरादाखल गोळीबार सुरू असल्याचे सांगण्यात येत आहे.