धनादेश अनादर प्रकरणी बुलडाणा अर्बन च्या कर्जदारास ६ महिने कारावास.
बाभूळगाव / प्रतिनिधी :- कर्जदाराने पतसंस्थेला दिला धनादेश खात्यात पैसे नसल्याने अनादरीत झाला. त्यामुळे थकीत कर्जदाराला दिवाणी न्यायालय कळंब न्यायाधीश श्री. अभय मल्लिकार्जुन विभुते यांचे न्यायालयाने धनादेश अनादर प्रकरणी ६ महिने साधा कारावासाची शिक्षा ठोठावली व आरोपीने धनादेशाच्या दुप्पट रक्कम रु. २२००००/- फिर्यादीला ३० दिवसाचे आतमध्ये द्यावी अशी शिक्षा सुनावली. कर्जदार शालिनी पुरुषोत्तम दरने रा. सुकली पो. पार्डी ता. कळंब जि. यवतमाळ यांनी बुलडाणा अर्बन कॉ-ऑप क्रेडिट सोसा. बुलडाणा यांच्या कळंब शाखेकडून रु.६ लाख वैयक्तिक कर्ज घेतले होते. सदर कर्जाची परतफेड कर्जदार यांनी न केल्यामुळे कर्ज थकीत झाले. त्यानंतर संस्थेने कर्जदाराकडे थकीत कर्ज रकमेची मागणी केली असता, कर्जदार शालिनी पुरुषोत्तम दरने यांनी बुलडाणा अर्बन संस्थेला जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक शाखा कळंब चा रु. ११००००/- चा धनादेश थकीत हप्त्याबद्दल दिला होता. तो त्याचे खात्यात पटविण्यासाठी पाठविला असता सदर धनादेश कर्जदार शालिनी पुरुषोत्तम दरने यांच्या खात्यात पुरेशी रक्कम नसल्यामुळे अनादरीत झाला. त्यावेळी बुलडाणा अर्बन पतसंस्थेकडून आरोपी शालिनी पुरुषोत्तम दरने यांचेवर कलम १३८ प्रमाणे दिवाणी न्यायाधीश कळंब यांचे कडे प्रकरण न. ३८/२०१६ हे दाखल केले होते. या प्रकरणामध्ये शाखा व्यवस्थापक कृणाल खडसे याची साक्ष व कागदोपत्री पुरावा ग्राहय धरून दिवाणी न्यायधीश कळंब श्री. विभुते यांनी आरोपी शालिनी पुरुषोत्तम दरने याना धनादेश अनादर प्रकरणी १३ आगस्ट २०२४ रोजी ६ महिने साधा कारावासाची शिक्षा ठोठावण्यात आली, व आरोपीने रु. २२००००/- ची नुकसान भरपाई म्हणून धनादेशाची दुप्पट रक्कम ३० दिवसाच्या आत फिर्यादी बुलडाणा अर्बन संस्थेला देण्याचा आदेश पारित केला अशा प्रकारची शिक्षा सुनावली. सदर प्रकरण फिर्यादी संस्थेच्या वतीने अॅड. जीवन लढी यांनी साक्षी पुरावे तपासून व योग्य युक्तिवाद करून कामकाज पहिले.धनादेश अनादर प्रकरणी बुलडाणा अर्बन च्या कर्जदारास ६ महिने कारावास.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here