नांदुरा गावाजवळ ट्रॅक्टर-ओमनी व्हॅनचा भीषण अपघात, सुदैवाने जिवीतहानी टळली

0
151

दिव्यदृष्टी डिजिटल वृत्तसेवा :

बाभूळगाव तालुक्यातील नांदुरा बु.(पुलाचे) गावाजवळ दि. 6 सप्टेंबरचे रात्री 11 वाजता दरम्यान हिडींबा जोडून असलेल्या ट्रॅक्टर व ओमनी चारचाकी वाहनाचा भीषण अपघात झाला. या अपघातात दोनही वाहनाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. मात्र सुदैवाने या अपघात कुठलही जिवीतहानी झाली नाही.

प्राप्त माहिती नुसार विना क्रमांकाचा ट्रॅक्टर ज्याला हिडींबा यंत्र जोडले होते, देवगावकडून बाभूळगाव कडे येत असताना नांदुरा गावाजवळीत रस्त्यावर असलेला खड्डा वाचविण्याच्या नादात अनियंत्रीत झाला त्याच वेळी बाभूळगावकडून देवगावकडे जाणारी ओमनी व्हॅन क्र. एम.एच.27एच.9266 या वाहनाच्या चालकाला समोर घडलेला प्रकार न कळल्याने त्याच्या वाहनाची हिडींबा यंत्राला धडक लागली. हा अपघात इतका भीषण होता की ओमनी वाहन तीन पलट्या खावून वाहन रस्त्याच्या कडेला झाडावर आदळले. तर हिडींबा यंत्र सुद्धा पलटी होवून चाकांसह एक्सल तुटले. या अपघातात दोनही वाहनाचे फार मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. मात्र वाहनाचे चालक, प्रवाशी यांना किरकोळ सोडता गंभीर दुखापत झाली नाही. ओमनी चालक हे व्यापारी असून ते राळेगाव येथील आठवडी बाजार आटोपून अमरावतीकडे जात होते. घटनेची माहिती मिळताच बाभूळगाव पोलीसांनी घटनास्थळ गाठले. अपघातग्रस्तांच्या मदतीला नांदुरा व बाभूळगाव येथील लोक धावून आले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here