प्रतिनिधी । बाभुळगाव
पद्मभूषण मेजर ध्यानचंद यांचा जन्मदिन संपूर्ण भारतभर राष्ट्रीय क्रीडा दिन म्हणून साजरा केला जातो. या दिनाचे औचित्य साधून मातोश्री नानीबाई घारफळकर विज्ञान महाविद्यालय बाभूळगाव येथील शारीरिक शिक्षण व क्रीडा विभाग व राष्ट्रीय सेवा योजना यांच्या संयुक्त विद्यमाने आत्मसंरक्षण मैदानी खेळाचे प्रात्यक्षिक व दहीहंडीचे दिनांक ३० ऑगस्ट रोजी आयोजन करण्यात आले. या खेळांच्या माध्यमातून महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना आत्मसंरक्षणाचे प्रशिक्षण देण्यात आले. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. मुकलवार होते व प्रमुख पाहुणे म्हणून विद्यालयाचे मुख्याध्यापक दिनेश रामटेके उपस्थित होते. यावेळी शारीरिक शिक्षण व क्रीडा विभागाचे संचालक राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी डॉ. सुशील बत्तलवार व महाविद्यालायचे ग्रंथपाल उमेश खडसे विचारपीठावर उपस्थित होते.

आज घडीला विद्यार्थ्यांवरील मानसिक तान वाढत चालला आहे. याचा परिणाम आपल्याला सर्वच क्षेत्रांत दिसून येतो आहे. शिक्षण क्षेत्रात विद्यार्थी हा फार महत्वाचा घटक आहे. त्याचे शारीरिक व मानसिक स्वाथ्य सुदृढ असले पाहिजे. मैदानी खेळामुळे विद्यार्थ्यांचे शारीरिक व मानसिक स्वास्थ्य सुदृढ राहते. विद्यार्थ्यांनी दरोरोज कोणताही एक खेळ खेळला पाहिजे. त्यामुळे विद्यार्थ्यांवरील अभ्यासाचा तान कमी होऊन विद्यार्थ्यांचा अभ्यासातील उत्साह वाढतो असे प्रतिपादन प्राचार्य डॉ. मुलकवार यांनी केले.

शालेय जीवनांत खेळले जाणारे खेळ फक्त मनोरंजनाचे साधन नसते तर त्याला आपण करियरचा भाग म्हणून बघितल पाहिजे. विद्यार्थ्यांना राज्य, राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय खेळामध्ये सहभागी व्हायचे असेल. तर त्याची सुरवात आपल्याला शालेय जीवना पासून करावी लागेल. असे प्रतिपादन शाळेचे मुख्याध्यापक श्री. दिनेश रामटेके यांनी केले. आजच्या आधुनिक जगात जीवन जगात असतांना विद्यार्थ्यां सोबत सर्वांनीच किमान एक तास तरी मैदानी खेळ खेळला पाहिजे. असे आवाहन आपल्या प्रास्ताविकातून डॉ. सुशील बत्तलवार यांनी केले. यावेळी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. मीनल वानखडे यांनी केले. तर उपस्थितांचे आभार प्रा. प्रियांका नैताम यांनी व्यक्त केले.
तर मैदानी खेळता तरबेज असणारे विद्यार्थी सत्यम पाटणकर, कार्तिक हजारे, मंथन वर्मा, प्रज्वल मडावी, वैभव मून, सोनाली चौधरी, केतकी रेके, अर्था बऱ्हाणपूरे, मोहिनी वरेकर, अर्चना पडघान, प्रणाली उईके, वैष्णवी बारेकर या विद्यार्थ्यांनी आत्मसंरक्षण मैदानी खेळाचे प्रात्यक्षिक सादर केले.यावेळी महाविद्यालयातील प्राध्यापक डॉ. स्मिता पाटील, डॉ. भावना पिल्लई, प्रा. अंकित चव्हाण, प्रा. आरती अष्टेकर व शिक्षकेत्तर कर्मचारी सुशांत बिरे,प्रशांत गायकवाड,संजय ठवळे,विवेक ठवळे, मनीष कडू,संदीप कुडे,सचिन मानकर,सागर गोळे,आकाश वातकर,चंद्रशेखर लांडगे, गजानन गावंडे,आशिष वानरें व विद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here