निवासी अपंग विद्यालयात दिव्यांग दिन साजरा
दिव्यदृष्टी डिजिटल वृत्तसेवा।बाभूळगाव.
निवासी अपंग विद्यालय बाभुळगाव या शाळेत ३ डिसेंबर रोजी जागतिक दिव्यांग दिनाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमास प्रमुख्य अतिथी म्हणून स्नेहदिप एज्युकेशन सोसायटी मसाळा जि. वर्धाचे संख्यापक सचीव प्रकाश भस्मे, पत्रकार सचीन पुरी उपस्थित होते.
सर्वप्रथम दीप प्रज्वलीत करून डॉ. हेलेन केलर यांच्या प्रतिमेचे पुजन करून पुष्पहार अर्पन करण्यात आले. कार्यक्रमाच्या सुरुवातिला प्रमुख पाहुणे तसेच पालक वर्ग यांचे स्वागत विद्यालयाचे मुख्याध्यापक एस. बी. आडगळे यांच्या हस्ते पुष्पहार देऊन करण्यात आले. जागतीक दिव्यांग दिनाचे औचीत्य साधुन दिव्यांग विद्यार्थ्याच्या विवीध कलागुणांना वाव देन्याकरिता क्रीडास्पर्धाचे आयोजन करण्यात आले होते. मुख्याध्यापक आडगळे यांनी दिव्यांगांच्या विवीध कलागुनांवर प्रकाश टाकला. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन एम. ए. धारक यांनी केले. प्राप्ताविक डी.पी येते तर आभार आरती कठाळे यांनी मानले. यावेळी अनुराधा मडावी, स्नेहदीप भस्मे, प्रभुदास सोयाम, विजय गोगीलवार, शाळेतील विद्यार्थी, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.