पांढरकवडा येथे महिलांनी मुंडण करून नोंदविला निषेध.
Divya Drushti Digital News
अलीकडच्या काळात राज्यात महिलांवर होणाऱ्या अत्याचाराच्या घटना मोठ्या प्रमाणात वाढल्या आहे. यात बलात्कार आणि हत्यांचे सत्र सातत्याने सुरूच आहे.अशा अनेक अमानवीय घटनांच्या निषेधार्थ यवतमाळ जिल्ह्यातील पांढरकवडा येथे निर्भय नारी विचारमंचच्या वतीने भव्य असा आक्रोश मोर्चा काढण्यात आला. बलात्कार करणाऱ्यांना पाठीशी घालणाऱ्या सरकारचा व प्रभावहिन कायद्याचा महिलांनी मुंडन करून निषेध व्यक्त केला.कायद्यामध्ये महिला सुरक्षेच्या विशेष तरतुदी शासनाने कराव्या, क्रूर व अमानवीय घटनांच्या दोषींना मृत्युदंड कायदा करण्यात यावा, यासह विविध मागण्यांसाठी आक्रोश मोर्चा काढण्यात आला.यावेळी मोर्च्यात शेकडो महिला सहभागी झाल्या होत्या.