बाभुळगांवातील सराईत गुन्हेगार शेख राहील जिल्हयातुन तडीपार.
दिव्यदृष्टी डिजिटल वृत्तसेवा : बाभुळगाव.
सध्या यवतमाळ जिल्हयात पोलीस अधिक्षक यांचे निर्देशा नुसार दोन किंवा दोनपेक्षा जास्त गुन्हे दाखल असलेल्या सराईत गुन्हेगारांविरुध्द प्रभावी प्रतिबंधात्मक कारवाया करण्यात येत असुन पोलीस स्टेशन बाभुळगांव, जिल्हा यवतमाळ हद्दीत राहणारा सराईत गुन्हेगार नामे शेख राहील शेख युनूस वय २४ वर्ष रा. धोंगडे बाबा से ऑऊट बाभुळगाव ता, बाभुळगांव याचे विरुध्द पोस्टे बाभुळगांव येथे दाखल असलेल्या गुन्हयावरुन उपविभागीय दंडाधिकारी यवतमाळ यांनी एक वर्षा करिता यवतमाळ जिल्हयातुन हद्दपारीचा आदेश दि. २७ सप्टेंबर रोजी पारित केला.त्यानुसार तडीपार इसमास पोलीस निरीक्षक, एल.डी. तावरे पोस्टे. बाभुळगावं यांचे आदेशान्वये बाभुळगांव पोस्टेच्या पोलीस पथकाने आज दि ०६ ऑक्टोंबर रोजी ताब्यात घेवून त्याची वैद्यकीय तपासणी करुन त्यास यवतमाळ जिल्हयातून डोगरीपुरा नगर, पोलीस स्टेशन चांदुर रेल्वे जि. अमरावती येथे हद्दपार करण्यात आले आहे.
सदरची कारवाई पोलीस अधिक्षक यवतमाळ कुमार चिंता,अपर पोलीस अधिक्षक,पीयुष जगताप,उपविभागीय पोलीस अधिकारी दिनेश बैसाणे यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस स्टेशन बाभुळगाव पोलीस निरीक्षक एल. डी. तावरे, सफौ.अशोक गायकी,दिपक आसकर,संजय भुजाडे यांनी पार पाडली.