दिव्यदृष्टी डिजिटल वृत्तसेवा : (चिखली)
दि.२२ सप्टेंबर रोजी चिखली तालुक्यातील खंडाळा मकरध्वज येथे शहीद जवान विजय जाधव यांना शासकीय इतमामात मुखाग्णी देण्यात आली.
भारत मातेचा सुपुत्र शहीद जवान विजय जाधव यांना रात्री १:०० वाजता त्यांचे बंधू राजेन्द्र जाधव यांच्या घरी आणण्यात आले, सकाळी ६:०० ते ९:०० अंत्यदर्शनासाठी चिखली येथे ठेवण्यात आले त्यानंतर गजानन नगर येथून छत्रपती शिवाजी महाराज चौक व बाबासाहेब आंबेडकर चौकाला प्रदक्षिणा घालून शव यात्रा मकर ध्वज खंडाळा येथें त्यांच्या मूळगावी नेण्यात आले व स्व.मिनाताई ठाकरे विद्यालयांच्या प्रांगणात भव्य मंडप तहसील प्रशासनाच्या वतीने टाकण्यात आला होता, शेजारीच शहीद जवान विजय जाधव यांना त्यांचा मुलगा विहान याने मुखाग्नी दिला त्यावेळेस उपस्थित सर्वांच्याच डोळ्यात विहान वय वर्ष १० व श्रेयान वय वर्ष ४ या दोघां चिमुकल्यांना पोरक झालेलं बघून सर्वांना अश्रू अनावर झाले व पत्नी कांचन वयाची तिशी ही न घाठता वैधतव्व आल्याने आमदार श्वेता महाले यांच्या सह उपस्थित महिलांनी अश्रूंना वाट मोकळी करून दिली व श्वेता महाले यांनी वीर पत्नी कांचन हीच मायेने जवळ घेत कडकडुन मिठी मारली,शासकीय इतमामात हवेत बंदुकीचे आठ राऊंड झाडून मानवंदना दिली,यावेळी केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव, माजी खासदार राजु शेट्टी,आमदार सदाभाऊ खोत, आमदार राजेंद्र शिंगणे,आमदार संजय गायकवाड, आमदार संजय कुटे आदींनी शोक संदेश पाठवले,याप्रसंगी आमदार श्वेता महाले पाटील, माजी आमदार राहुल बोंद्रे, रयत क्रांती संघटनेचे राज्य प्रवक्ते प्रशांत ढोरे पाटील, ठाणेदार संग्राम पाटील, नायब तहसिलदार गायकवाड, एन सी सी ऑफिसर निकम सर, नगरसेवक राजू गवई, पोफळे,विनायक सरनाईक,मनोज लाहुडकर,बाळू भिसे,भाई प्रदीप अंभोरे, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते अनिल वाकोडे, संजय हिवाळे,गणेश धुंदळे, शिवाजी देशमुख, त्रिदलचे ता.प्रमुख जयराम सोळंकी, प्रमोद सुरडकर, दिपक भिसे, प्रमोद आराख, सरपंच जाधव ताई, माजी सरपंच किशोर जाधव, मयूर निकम,दगडु साळवे,नागपुर येथील श्रीनिवासन सर, मदन देशमुख व त्यांचे सहकारी याप्रसंगी उपस्थित होते.