बाभुळगाव येथे तान्हा पोळा उत्साहात.
……….. 31 वर्षापासून केले जात आहे आयोजन.
प्रतिनिधी । बाभूळगाव.
दरवर्षीप्रमाणे याही वर्षी बाभूळगाव येथील आबाजी महाराज देवस्थान समोर तान्हा पोळ्याचे आयोजन करण्यात आले होते.
तान्हा पोळ्यात चिमुकल्यांनी आपल्या बैल जोड्या उत्कृष्टरित्या सजवून आणल्या होत्या. गेल्या 31 वर्षा पासून डॉ. रीखबचंद शांतीलालजी जैन हे तान्हा पोळ्याचे आयोजन स्वखर्चाने करीत असतात.
लाकडी बैला मध्ये आरव होटे याने प्रथम क्रमांक पटकावला तर मातीच्या बैलामध्ये हसनैन खान याने प्रथम क्रमांक मिळविला. बक्षीस मिळविणाऱ्या इतर स्पर्धकांमध्ये रुद्र तलमले, अर्णव मंगळे, आरव इंगोले, अनुष्का डडमल, सोहम गावंडे, भव्या तातेड, आगम तातेड, लावण्य सहारे, स्वराज वांढरे, मृदुल खोडे, परि बुरेवार, दैविक घाटोड, श्लोक इंगोले, शिवराज जगताप, पार्थ जांभुरे, युग वंदे, परीधी राऊत, मिताश चेंडकापुरे, आर्या खडसे यांचा समावेश आहे.
बक्षीस वितरण समारंभाला डॉ. रीखबचंद जैन, प्रकाशचंद छाजेड, बळवंतराव जगताप, श्रीकांत कापसे, श्याम जगताप, भारत इंगोले, अमर शिरसाट, अनिकेत पोहोकार, नन्ना महाजन, राजू नवाडे, रामदास वातकर, प्रदीप नांदुरकर, मुन्ना छल्लाणी, विजय वर्मा, बंडू नवाडे, सुरेशचंद तातेड, स्वरूपचंद तातेड, शेख रहिमतुल्ला भाई, नितीन तातेड, प्रणय तातेड, डमू इंगोले, गौरव तातेड, गजानन गोटफोडे, निखिल तातेड,अमोल इंगोले, शब्बीर खान, आशिष तातेड,गोपाल मनवर, जयेश भन्साली प्रामुख्याने हजर होते. आभार प्रदर्शन आरिफ अली यांनी केले. आघम निखिल तातेड या चिमुकल्याने टाकाऊ वस्तु पासून शेतीचा देखावा निर्माण करून उपस्थितांची मनी जिंकली. बाभूळगाव नगरपंचायतीने बैलपोळ्या प्रमाणे तान्ह्या पोळ्याला जाहीर केलेली बक्षिसे दिली.
कार्यक्रमाप्रसंगी नुकतेच निवडून आलेले काँग्रेसचे नगरसेवक अक्षय राऊत यांचा सत्कार करण्यात आला. सोबतच एम एस सी मॅथ परीक्षा उत्तीर्ण केल्याबद्दल अवसाफ अली यांचाही पुष्पगुच्छ देऊन मान्यवरांच्या हस्ते सत्कार केला गेला.