मातोश्री नानीबाई घारफळकर विज्ञान महाविद्यालय बाभूळगाव येथे शिक्षकांचा गौरव
Divya Drushti Digital News / Babhulgaon
मातोश्री नानीबाई घारफळकर विज्ञान महाविद्यालय बाभूळगाव येथे राष्ट्रीय सेवा योजना व गणित विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक ५ सप्टेंबर रोजी राष्ट्रीय शिक्षक दिन साजरा करण्यात आला. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. पी. एन. मुलकलवार उपस्थित होते. राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रमअधिकारी तथा क्रीडा व शारीरिक शिक्षण विभागाचे डॉ. सुशील बत्तलवार व महाविद्यालयाचे ग्रंथपाल उमेश खडसे यावेळी विचारपीठावर उपस्थित होते.
प्राचीन काळापासून ज्ञान दानाच्या प्रक्रियेत शिक्षकाला फार महत्त्वाचे स्थान आहे. शिक्षक हा पिढी घडविण्याचे कार्य करतो. त्यामुळे शिक्षकाला सामाजिक क्षेत्रात मनाचे स्थान प्राप्त झाले आहे.बौद्धिक क्षेत्रात योगदान देणारा व्यक्ती आपल्या बुद्धी कौशल्याच्या जोरावर ज्ञानाचा साठ एका पिढीपासून दुसऱ्या पिढीपर्यंत पोहोचवण्याचे कार्य करत असतो. मनुष्य हा आजीवन विद्यर्थी असतो तो प्रत्येक क्षणी इतरांकडून काही तरी शिकत असतो. शिकणे आणि शिकवणे ह्या निरंतर चालणाऱ्या प्रक्रिया आहे. त्या प्रक्रीयाचे भाग आपण सार्वजन आहोत. असे प्रतिपादन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.पी. एन. मुलकलवार यांनी केले. त्यांनी यावेळी महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक मंडळींना भेट वस्तू देऊन त्यांचा गौरव करण्यात आला.
राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी तथा क्रीडा व शारीरिक शिक्षण विभागाचे डॉ. सुशील बत्तलवार यांनी एक झाड शिक्षक के नाम हा उपक्रम राष्ट्रीय सेवा योजनेच्या वतीने वर्षभर राबविण्याचा संकल्प यावेळी केला. यावेळी महाविद्यालयाच्या परिसरात वृक्षारोपण करण्यात आले एक झाड शिक्षकाच्या नावे लाऊन त्यांचा सन्मान करण्यात आला. यावेळी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गणित विभागाच्या प्रा. कांचन कठाळे यांनी केले. तर उपस्थितांचे आभार प्रा. आरती अष्टेकर यांनी व्यक्त केले.